Ad will apear here
Next
‘राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर कार्यक्रम’
मुंबई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन १० जूनला पूणे येथे होत असून, त्यानिमित्त राज्यभरामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय राष्ट्रवादीच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाची सांगता सभाही याचदिवशी पार पडणार आहे,’ अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल सांगता सभा पुणे येथे सायंकाळी चार वाजता शिंदे हायस्कूलच्या मैदानावर पर्वती येथे होणार आहे. या सांगता सभेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हेही उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मुंबईबाहेर जाण्यास कोर्टाने बंदी घातली होती; परंतु कोर्टात याबाबत मागणी केल्यानंतर कोर्टाने त्यांना परवानगी दिली असल्याने ते सभेला उपस्थित राहणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय संमेलन नऊ आणि १० जूनला होणार होते; मात्र राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे पुढे ढकलण्यात यावे, अशी मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे आत्ता हे राष्ट्रीय संमेलन २३ आणि २४ जून रोजी पुणे येथे होणार आहे. सध्या पक्षाच्या आढावा बैठका सुरू असून, लवकरच पक्षाची कार्यकारिणीही जाहीर होणार आहे,’ असे मलिक म्हणाले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZWHBP
Similar Posts
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयकपदी सुहास उभे पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश समन्वयक पदावर कोथरुड येथील युवा कार्यकर्ते सुहास उभे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले.
‘उमेदवार चाचपणीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल’ मुंबई : ‘लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिथे शक्ती आहे तिथे काम करण्यासाठी, जागा लढवण्यासाठीच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि तिथल्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल,’
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत कार्यक्रम मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे ११ डिसेंबर २०१८ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हात दिला जाणार आहे.
शरद पवार यांच्या १३ जूनपासून जिल्हानिहाय बैठका मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १३ जून २०१९पासून प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका घेणार आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language